Ad will apear here
Next
राणी लक्ष्मीबाई जयंतीनिमित्त रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे शोभना नारायण विद्यालयास पुस्तकभेट
शोभना नारायण हायस्कूलसाठी सीमा नानिवडेकर यांच्याकडे पुस्तके देताना रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, प्रदीप जोशी, विद्या गुर्जर, सुहास ठाकुरदेसाई, उदय काजरेकर.

नानिवडे :
रणरागिणी राणी लक्ष्मीबाईंच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे नानिवडे (ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग) येथील शोभना नारायण विद्यालयाला तीन हजार रुपयांची पुस्तके, राणी लक्ष्मीबाईंची प्रतिमा आणि चरित्र पुस्तके देण्यात आली. संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी पाच हजार रुपयांची देणगी प्रदान केली.

मार्गदर्शन करताना रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर.

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर म्हणाले, ‘संघाची स्थापना १९२८मध्ये झाली. आता शतकाकडे वाटचाल करत आहोत. संस्थेतर्फे विविध उपक्रम राबवले जातात. शोभना नारायण हायस्कूल हे कऱ्हाडे ज्ञातीमार्फत चालवले जाणारे एकमेव हायस्कूल आहे. विंग कमांडर मोरेश्वर नानिवडेकर यांच्या स्मरणार्थ विश्राम नानिवडेकर यांच्या देणगीतून प्रथमच पुस्तके देण्यात आली आहेत. दर वर्षी यात वाढ करून शाळांना दहा हजार रुपयांपर्यंतची पुस्तके देण्याचा मानस आहे. यापूर्वी राणी लक्ष्मीबाई जयंती कार्यक्रम कोट आणि कशेळी येथे साजरा करण्यात आला होता.’

राणी लक्ष्मीबाईंची प्रतिमा भेट देताना माधव हिर्लेकर, प्रदीप जोशी, विद्या गुर्जर, सुहास ठाकुरदेसाई, उदय काजरेकर.

कार्यक्रमाला सिंधुदुर्ग कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष प्रदीप जोशी, सोमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक शरच्चंद्र नानिवडेकर, अध्यक्ष सीमा नानिवडेकर, सचिव दत्तात्रय नानिवडेकर, मुख्याध्यापक शिरीष शेंबवणेकर, मनोहर महाजन, शोभा तांबे, नीलम जोशी, सीताराम के. गुर्जर, रत्नागिरी कऱ्हाडे संघाच्या सचिव शिल्पा पळसुले-देसाई, प्रतिभा प्रभुदेसाई, सुहास ठाकुरदेसाई, उदय काजरेकर, समीर नानिवडेकर, वंदना नानिवडेकर, नीलम हिर्लेकर, नारायण नानिवडेकर, भास्कर हिर्लेकर, दत्ताराम फेफडे, डॉ. शरद प्रभुदेसाई आदी उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना सिंधुदुर्ग कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष प्रदीप जोशी.

प्रमुख पाहुणे आणि सिंधुदुर्ग कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष प्रदीप जोशी म्हणाले, ‘रणरागिणी राणी लक्ष्मीबाईंचा आदर्श विद्यार्थिनींनी घ्यावा. कोकणाने अनेक भारतरत्न, शास्त्रज्ञ, कलाकार दिले आहेत. प्रभू श्री रामाचा आदर्शवाद व श्रीकृष्णाचा व्यवहारवाद यांची सांगड घालून विद्यार्थ्यांनी पदवी मिळवावी. त्यानंतर तुम्हाला कर्तृत्व व नेतृत्वाचीही संधी मिळेल. जे स्वप्न बघाल ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.’

या निमित्ताने शाळेमध्ये विद्यार्थिनींसाठी स्पर्धा घेण्यात आल्या. त्यातील १०० मी. धावणे व उंच उडी प्रकारात सेजल वाडेकर, २०० मीट धावणे, लांब उडी आणि गोळा फेक या प्रकारांत संचिता साळवी, ४०० मी. धावणे या प्रकारात श्रुती साळवी, थाळी फेक प्रकारात खुशी कुडकर तर कॅरममध्ये सोमेश्वरी भोसले या मुलींनी प्रथम क्रमांक पटकावले. या वेळी विद्यार्थिनींनी राणी लक्ष्मीबाईंविषयी भाषणे केली.

विद्या गुर्जर म्हणाल्या, ‘विंग कमांडर भावाच्या स्मरणार्थ आणखीही काही मदत कऱ्हाडे ब्राह्मण संघासाठी करणार आहोत. त्याला वाचन, संगीत व सर्व विषयांची आवड असल्याने पंडित म्हणत. भाऊ दहावी परीक्षेतही बोर्डात आला होता.’

सोमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक शरच्चंद्र नानिवडेकर यांनी सांगितले, ‘राणी लक्ष्मीबाई जयंती दर वर्षी शाळेत साजरी केली जाईल. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करू. ज्येष्ठांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळेल.’ 

सीमा नानिवडेकर म्हणाल्या, ‘विद्यार्थ्यांनी निश्चय करावा. स्वतःची प्रतिमा बनवा. राणी लक्ष्माबाईंचा आदर्श घेऊन गुण आत्मसात करा. यश नक्की मिळेल.’

शोभना नारायण हायस्कूलमध्ये घेतलेल्या क्रीडा स्पर्धांतील विजेत्यांसह बसलेले मान्यवर अध्यक्ष शरच्चंद्र नानिवडेकर, माधव हिर्लेकर, सीमा नानिवडेकर, प्रतिभा प्रभुदेसाई, शिल्पा पळसुले-देसाई, सुहास ठाकुरदेसाई, उदय काजरेकर, समीर नानिवडेकर.

मुख्याध्यापक शिरीष शेंबवणेकर यांनी शाळा स्थापनेपासूनचे अनेकविध अनुभव सांगितले. ‘कोकण प्रज्ञा शोध परीक्षेतही शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. सुरुवातीला ९५ विद्यार्थी शिकत होते. दहावीचा निकाल १०० टक्के लागतो व प्रत्येक विद्यार्थी ९० ते ९२ टक्के गुण मिळवतो. विद्यार्थी पुस्तके वाचतात आणि नेमके काय वाचले त्याचा अभिप्रायही लिहितात. दहावीच्या बॅचसाठी डिसेंबर ते मार्च या कालावधीत रात्र अभ्यास वर्ग चालवला जातो,’ अशी माहिती त्यांनी दिली. 
सूत्रसंचालन एन. एस. जाधव यांनी केले. आभार डी. एस. भोसले यांनी मानले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZROCG
Similar Posts
देशासाठी पदक मिळवल्याचा आनंद अवर्णनीय : डॉ. निशिगंधा पोंक्षे रत्नागिरी : ‘कझाकस्तानमध्ये यंदा झालेल्या आशिया कप स्पर्धेत बायथले (Biathle) आणि ट्रायथले (Triathle) स्पर्धेत मी ५५ वर्षे गटात भाग घेतला. प्रचंड थंड पाण्यात पोहायचे, धावायचे, शूटिंग करायचे अशा प्रकारे क्षमतेचा कस लावणाऱ्या या वेगळ्या स्पर्धेत भारतासाठी मी दोन सुवर्णपदके मिळवू शकले. याचा आनंद अवर्णनीय आहे,’ अशा शब्दांत डॉ
महत्त्वाच्या पदांवर स्त्रिया असल्यास लोकांच्या समस्या ममत्वाने सोडवू शकतात रत्नागिरी : ‘अनेक क्षेत्रांत महिलांना आरक्षण द्या, असे म्हटले जाते; पण गुणांना आरक्षणाची गरज नसते. गुण व कर्तृत्व असेल तर प्रतिकूलतेवर मात करून महिला गौरवास्पद कामगिरी करतात. त्या स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. महत्त्वाच्या पदांवर स्त्रिया विराजमान झाल्यास ममत्व, वात्सल्य, करुणेने त्या लोकांच्या समस्या
रत्नागिरीत बाया कर्वे स्त्री कौशल्य विकास केंद्राचे १७ नोव्हेंबरला उद्घाटन रत्नागिरी : सव्वाशे वर्षांची परंपरा लाभलेल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव येथील प्रकल्पात बाया कर्वे स्त्री कौशल्य विकास केंद्र सुरू होणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी हे केंद्र मोठ्या स्वरूपात काम करणार आहे. या केंद्राचे उद्घाटन १७ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी साडेतीन वाजता मारुती मंदिर
एड्सविषयीच्या जनजागृतीत नर्सेसचे योगदान महत्त्वाचे रत्नागिरी : ‘एड्सबद्दलच्या जनजागृतीत आणि रुग्णांच्या समुपदेशनात नर्सेसचे योगदान महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील आशा सेविका, नर्सेस या आरोग्य यंत्रणेच्या खूप मोठ्या समन्वयक आहेत. त्यामुळे जनजागृतीची मोठी जबाबदारी नर्सिंग शिकणाऱ्या विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांवर आहे. एड्सग्रस्तांना समाजाच्या पाठिंब्याचीही

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language